गोवा सध्या राजकीय पक्षांचे पर्यटन केंद्र झाले आहे*... प्रमोद सावंत

सगळ्या जागांसाठी काट्याची टक्कर. या रोचक गोवा निवडणुकीवर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी *सध्या राजकीय पक्षांचे पर्यटन केंद्र गोवा* असा उल्लेख सुदर्शन न्युज चैनल ला मुलाखत देताना केला आहे.

Snehal Joshi .
  • Jan 28 2022 10:58PM

गोवा,,  28 जानेवारी             

गोवा है राज्य पर्यटना साठी अग्रेसर राज्य आहे.  भारतीय जनता पार्टी  चे येथे गेल्या  10 वर्षा पासून स्थिर सरकार आहे.  2020  गोवा विधानसभा निवडणूक  14 फेब्रुवारी ला नव्या मुख्यमंत्रीची  बोली लागणार,  येणाऱ्या काळात मुख्यमंत्री पदाचा दावेदार कौन .. ? हा प्रश्न अधिक गडद  होत चालला आहे.  संपूर्ण  देशाचे लक्ष्य या निवडणुकीने खेचले आहे. कारण सगळ्याच मोठ्या राजकीय पक्षाने आपल्या पार्टीचे नशीब या राज्यात पणाला लावले .

टी एम सी, एम जी पी, आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस +शिवसेना युती आणि गोव्यातील विद्यमान भाजप सरकार सोबत इतर अनेक अपक्ष उमेदवार. सगळ्या  जागांसाठी काट्याची टक्कर. या रोचक गोवा निवडणुकीवर विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी *सध्या राजकीय पक्षांचे पर्यटन केंद्र गोवा* असा उल्लेख सुदर्शन न्युज चैनल ला  मुलाखत  देताना केला आहे.                                                      

   यावेळी सावंत म्हणाले इतक्या मोठ्या पक्षांची राजकीय बाजी पणाला लागल्याने ही निवडणूक भारतीय जनता पार्टी साठी देखील परीक्षाच आहे.50 वर्षाच्या काळात जे काम झालं नाही. ते भारतीय जनता पार्टीने गेल्या 10 वर्षाच्या स्थिर सरकार मध्ये करून दाखवले. केंद्र आणि राज्य डबल इंजिनचे सरकार गेल्या 8 वर्षापासून स्थापित झाल्यानंतर आम्ही गोव्यात केंद्र सरकारच्या मेकिंग इंडिया, क्लीन इंडिया, स्किल इंडिया,  ह्युमन डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर.  स्वयंपूर्ण गोवा या  योजना संयुक्त रित्या गावागावात  राबवल्या.  कोरोना  काळात केंद्र सरकारने स्किल इंडिया फॉर्मुला डेव्हलप केला. आणि गोव्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने रूट लेवल ला राबविण्यात आला.  त्यामुळे गावागावातील जनतेला आत्मविश्वास निर्माण झाला आहे. की येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीचे जर राज्य आले तर गोवा हे स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.  गोव्याची शिक्षित जनता सुज्ञ आहे. बाहेरच्या राज्यातील कितीही पक्ष गोव्यात आले आणि गोव्याला राजकीय पक्षाचे पर्यटन केंद्र केले, फुकट देण्याचे आश्वासन केले. तरीही जनता जनार्दन ही भारतीय जनता पार्टीलाच निवडून देईल. कारण यंदा भारतीय जनता पार्टी आत्मविश्वासाने सांगू शकते 2022 गोव्यात भाजपा 22 प्लसच  निवडून येणार.

4 Comments

vega

  • Sep 27 2022 3:29:14:550PM

vega

  • Sep 27 2022 3:29:13:527PM

vega

  • Sep 27 2022 3:29:13:290PM

vega

  • Sep 27 2022 3:29:12:620PM

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार