सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरु पादुका दर्शन उत्सवाला डॉ. सुरेश चव्हाणकेंनी दिली भेट

एकाच ठिकाणी २१ संत आणि श्री गुरूंच्या पादुकांची दर्शन घेण्याची संधी या उत्सवामुळे भाविकांना मिळाली.

Sudarshan MH
  • Mar 8 2025 8:05PM

मुंबई: सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या श्री गुरू पादुका दर्शन सोहळ्याची उत्साहात सुरूवात झाली आहे. या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात २१ संतांच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. भक्तीचा महाकुंभ दोन दिवस भरणार आहे. या कार्यक्रमाचे उद्धघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या या श्री गुरू पादुका दर्शन उत्सवाला सुदर्शन न्यूज चॅनलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री. सुरेश चव्हाणके यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन घेतले आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

आजपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून, २१ श्री गुरूंच्या पादुकांसाठी वरळीच्या NSCI डोममध्ये आकर्षक मंदिरे साकारण्यात आली आहे. सद्‌गुरूंच्या पादुकांचे दर्शन घडविणाऱ्या 'श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव'सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांनी हजेरी लावली. भक्तीमय वातावरणात या सोहळ्याला सुरूवात झाली आहे. भारताला संपन्न आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव लाभले आहे. त्याचं दर्शन या भक्तीच्या महाकुंभात होत आहे. भक्तीच्या महाकुंभात एकाच छत्राखाली २१ श्री गुरूंच्या मूळ पादुकांचे दर्शन घेण्याची भाविकांना मिळणार आहे.

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार