जिल्ह्यात गुरूवारपासून प्रथम द्वितीय फेरीत चार दिवस गृहमतदान; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सुविधा

जिल्ह्यात गुरूवारपासून प्रथम द्वितीय फेरीत चार दिवस गृहमतदान; ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सुविधा

Sudarshan MH
  • Nov 12 2024 4:16PM
जिल्ह्यात गुरूवारपासून प्रथम द्वितीय फेरीत चार दिवस गृहमतदान; 
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांसाठी सुविधा
 
1 हजार 164 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदानासाठी पात्र
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
 
नंदुरबार, दिनांक 12 नोव्हेंबर, 2024 
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात गुरूवार, 14 नोव्हेंबरपासून गृहमतदानास सुरूवात होणार आहे. सलग चार दिवस दोन फेरीत रविवार 17 नोव्हेंबरपर्यंत हे मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली यांनी दिली आहे.
 
निवडणूक आयोगाने 85 वर्षावरील नागरिक आणि दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सोय उपलब्ध दिली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार मतदार संघासाठी गृह मतदानाची पहिल्या फेरीची भेट 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितीय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून घेतला आहे. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 164 मतदार गृहमतदानासाठी पात्र ठरले आहेत. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये अक्कलकुवा-221, शहादा-257, नंदुरबार-383, नवापूर-285 असे एकूण 1 हजार 164 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.
 
गृहमतदानासाठी विधानसभाक्षेत्रात एकूण 48 पथके तयार करण्यात आली आहेत. गृहमतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी ही पथके जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेणार आहेत. गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येणार आहे. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.
 
 
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार